Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणार

Continues below advertisement

Aaditya Thackeray Worli Vidhan Sabha : वरळीत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, आदित्य ठाकरे अर्ज भरणार

मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे (Mahim Vidhan Sabha) सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ठाकरे घराण्यातील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल, कारण या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. 

अमित ठाकरेंना (Amit Thackeray) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल माहीममधील अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. आता माजी मंत्री आणि वरळीतील ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी देखील अमित ठाकरेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचे दोन भाऊ अमित ठाकरे आणि वरुण सरदेसाई देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत. मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram