Aaditya Thackeray PC : हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी! आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Aaditya Thackeray on India vs Bangladesh : बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिली कसोटी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवली जाईल.
यादरम्यान, या कसोटी सामन्याच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळ ठाकरे यांच्या मार्गावर चालत क्रिकेट सामन्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले.
शेजारच्या देशात हिंदू समाज हिंसाचाराला तोंड देत असताना बांगलादेश क्रिकेट संघाला भारत दौऱ्यावर का येऊ देत आहे, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि बीसीसीआयला केला.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, भारतातील ट्रोल्स बांगलादेशमध्ये हिंसाचाराच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत तर बीसीसीआय आपल्या संघाचे आयोजन करत आहे. आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या २ महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?