Aaditya Thackeray on Abdul Sattar: सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महत्या नव्या नाही, ठाकरेंची जोरदार टीका

Continues below advertisement

Aaditya Thackeray on Abdul Sattar: सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महत्या नव्या नाही, ठाकरेंची जोरदार टीका

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान अशातच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मात्र असे असताना शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर यातील तीन शेतकरी खुद्द कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. दरम्यान याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सत्तार यांनी दिलेलं उत्तर संताप आणणारं आहे. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य सत्तार यांनी केले आहेत. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली असल्याचं देखील सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सत्तारांवर निशाणा साधलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram