Har Har Mahadev : रोहित पवार ते आदित्य ठाकरे, हर हर महादेव चित्रपटाबाबत भूमिका काय?

Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. आज (8 सप्टेंबर) त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे. याबाबत मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav)  यांनी एबीपी माझाला माहिती दिली. 'आज मनसेचा शो आहे, हिंमत करू नका.' असं यावेळी अविनाश जाधव म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola