Aaditya Thackeray MLA Case : सेना शिंदेंचीच, नार्वेकरांचा निर्णय...आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Aaditya Thackeray MLA Case : सेना शिंदेंचीच, नार्वेकरांचा निर्णय...आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गटच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar)दिला आहे. पक्ष हा बहुमताच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदे गटाकडे (Shinde Faction) आहे असंही नार्वेकर म्हणाले. 21 जून 2022 रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट (Shinde Faction) हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते असं महत्वपूर्ण निरीक्षण राहुल नार्वेकरांनी नोंदवरलं. तर पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत असा निर्णय नार्वेकरांनी दिला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola