Aaditya Thackeray Full PC : 50 जण दावोसला कशासाठी जाणार, परराष्ट्र मंत्रालयाला विचारणार
Aaditya Thackeray Full Speech : "50 जण दावोसला कशासाठी जाणार, परराष्ट्र मंत्रालयाला विचारणार"
मुंबई : असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. मागचा दौरा त्यांनी केला तेव्हा 28 तासात 40 कोटी रुपये खर्च केले होते. आधी 50 खोके होते आता हे 50 लोकं घेऊन जात आहे असं म्हणत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. ते मुंबईत (Mumbai News) पत्रकार परिषदेत बोलत होते. वऱ्हाड निघाले लंडनला तसं हे वऱ्हाड निघाले दाओसला असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सध्याचे खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्णटीम, मुख्यमंत्र्याचे ओएसडी यांचा समावेश आहे.या शिष्टमंडळात कोणीही बिझनेसमॅन नाहीत. येथे 50 लोक काय करतील? तिथं फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील, सामंजस्य करारावर फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत. इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.