Aaditya Thackeray On Ayodhya Tour : अयोध्येत दर्शनासाठी जातोय, राजकारणासाठी नाही: आदित्य ठाकरे

मुंबई : येत्या 10 जून रोजी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी 5 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आयोजित केला आहे. काकाच्या दौऱ्यानंतर पुतण्या जात असल्याने शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना जय्यत तयारी करत आहे. काका अयोध्येत जाण्याआधीच पुतण्याचे होर्डिंगही लागले आहेत, तेही काकाच्या विरोधात, त्यामुळे अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने काका आणि पुतण्याचा अयोध्या दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola