Aaditya Thackeray Full Speech Jalgaon : वैशाली सूर्यवंशींचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे जळगावात

Continues below advertisement

Aaditya Thackeray Full Speech Jalgaon : वैशाली सूर्यवंशींचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे जळगावात 

विद्यमान आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे पुन्हा एकदा वरळी विधानसभेसाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून अद्याप आदित्य ठाकरेंच्या विरोधात आव्हान उभं करण्यात आलं नसलं तरीही मनसेने मात्र त्यांचा गडी या रणांगणात उतरवला आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना वरळीची उमेदवारी मनसेकडून देण्यात आली आहे. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी संदीप देशपांडेंसाठी खास पत्र लिहित संदीप तुला वरळीतून निवडून यावच लागेल असा राजमंत्रही दिला आहे.   राज ठाकरेंच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा काकाने पुतण्याविरुद्ध शिवतीर्थ आणि शिवसेना भवनाच्या अंगणातच शड्डू ठोकलाय. आदित्य ठाकरे हे जेव्हा पहिल्यांदा वरळीतून उभे राहिले होते, त्यावेळी मनसेकडून कोणाताही उमेदवार मैदानात उतरवण्यात आला नव्हता. पण अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असताना ठाकरेंकडून मात्र उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलाय. त्यानंतर राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना वरळीचं आव्हान यशस्वीरित्या पेलण्याच्या शुभेच्छा आणि सूचना दिल्या आहेत.   राज ठाकरेंचं संदीप देशपांडेंना पत्र राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना एक खास पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, प्रिय संदीप, सस्नेह जय महाराष्ट्र! वरळीतून तुला निवडून यावच लागेल... शुभेच्छा..या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे.   माहीमच्या मैदानात तिहेरी लढत राज ठाकरेंचे पुत्र यापलिकडे ओळख निर्माण करण्यासाठी अमित ठाकरे आता विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. पण ही निवडणूक जरी अमित ठाकरे लढवणार असले तरीही ही परीक्षा मात्र राज ठाकरेंची आहे. मुंबईतील मनसेच्या बालेकिल्ल्यातूनच अमित ठाकरेंना मैदानात उतरवण्यात आलंय. पण असं असलं तरीही या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. कारण ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्हींकडून त्यांचे उमेदवार माहिमच्या मैदानात उतरवण्यात आलेत.   माहिम जसा हा मनसेला बालेकिल्ला तसाच ठाकरेंच्या शिवसेनेचाही गड आहे. त्यातच 2019 मध्ये राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना ती परतफेड करण्याची संधी होती. पण ठाकरेंनी याच मतदारसंघातून त्यांचा महेश सांवत हा शिलेदार उभा केलाय. म्हणूनच जसं अमित ठाकरेंना महेश सावंत यांचं आव्हान आहे, त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान दिलंय.  त्यामुळे कोणते ठाकरे कोणतं आव्हान पेलण्यात यशस्वी ठरणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram