Aaditya Thackeray Full PC : मी या प्रकरणाला राजकीय रंग देणार नाही... आदित्य ठाकरे पुढे काय म्हणाले ?

Continues below advertisement

Aaditya Thackeray Full PC : मी या प्रकरणाला राजकीय रंग देणार नाही... आदित्य ठाकरे पुढे काय म्हणाले ?  मुंबई मुंबईतील वरळीत (Worli Hit And Run) असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ आज सकाळी हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिला. त्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेनं मुंबई हादरली आहे. यात एका महिलेनं तिचे प्राण गमावले आहेत. तर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी कार चालक शिंदे गटाचे (Shinde Group) पालघरमधील उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलं आहे. सध्या मिहीर शहा (Mihir Shah) फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेवरुन ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.   सदर घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस स्थानकात जाऊन माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. या घटनेतील चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याला पकडण्याची कारवाई सुरु आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मुंबईत गाडी चालवण्याची पद्धत बिघडत चालली आहे. त्यामुळे कडक कारवाई करण्याची गरज आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.   राजकीय हस्तक्षेप नको- आदित्य ठाकरे राजेश शाह कोण आहे, ही तुम्ही माहिती घ्या...मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कोणी कोणत्याही पक्षात असलं, तरी मी राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. या भारताचा नागरिक म्हणून आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram