Devendra Fadnavis Yavatmal Tour : देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर, विकास कामांचा शुभारंभ करणार
यवतमाळ जिल्ह्यात 335 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि शुभारंभ होणार आहे. यात आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किंमतीच्या कामांचा समावेश आहे. तसेच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेची 158 कोटींची कामे आणि विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे 'आदी कर्मयोगी अभियान' (Aadi Karmayogi Abhiyan) सुरू करण्यात येणार आहे. "आदी कर्मयोगी अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून यवतमाळच्या पोस्टल मैदान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे." Devendra Fadnavis आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते आदिवासी विकास विभागाच्या 'आदी कर्मयोगी' योजनेच्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत. सोबतच विविध विकासकामांचा शुभारंभ आणि योजनांच्या लाभाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.