CM Eknath Shinde Ayodhya : अयोध्येसाठी निघालेल्या स्पेशल ट्रेन मध्ये डॉक्टरांची टीम तैनात

अयोध्येसाठी निघालेल्या स्पेशल ट्रेन मध्ये डॉक्टरांची टीम देखील तैनात आहे. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे डॉ निलेश देशमुख, प्रसाद सूर्यराव, गजानन नारवल आणि अन्य डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. ज्यांना बरं वाटत नाही, सर्दी खोकला, असिडिटी, डायबिटीस चेक, असे सर्व प्रार्थामिक उपचार केले जात आहेत. या टीमकडे सर्व प्रकारची औषधं आणि इंजेक्शन देखील उपलब्ध आहेत, अत्यावश्यक वेळेस उपयोगी पडेल असे सर्व या ट्रेन मध्येच उपलब्ध असल्याने शिवसेना वैद्यकीय कक्षा मार्फत शिवसैनिकांचे आरोग्य देखील सुस्थितीत राखले जात आहे,  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola