Gadchiroli : भामरागडमध्ये गरोदर महिलांसाठी विशेष वैद्यकीय पथक दाखल, एबीपी माझाच्या बातमीची दखल

Continues below advertisement

Gadchiroli :  पावसाचा जोर वाढताच गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये नागरिकांची होणारी गैरसोय एबीपी माझानं प्रत्येक वेळी बातमीच्या स्वरूपात महाराष्ट्रासमोर मांडली आहे...  आणि आता त्याचीच दखल घेत भामरागडमध्ये गरोदर महिलांसाठी विशेष वैद्यकीय पथक दाखल झालं आहे...पहिलांदाच स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता विशेष आरोग्य पथक भामरागडला रवाना झाले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram