Marathi Letters Changed : मराठीतील 'या' दोन अक्षरांमध्ये बदल, वेगळ्यापद्धतीनं लिहावे लागणार ल आणि श
Continues below advertisement
मराठी शब्द लिहिताना आता दोन अक्षरं तुम्हाला बदललेल्या पद्धतीनं लिहावे लागणार आहेत. हिंदीतून मराठीत आलेली अक्षररुपं बदलण्यासाठी वर्णमालेत काही बदल करण्यात आलेत. त्यात श आणि ल ही दोन अक्षरं लिहिताना आता वेगळ्या पद्धतीनं लिहावी लागणार आहेत. देठयुक्त ल ऐवजी आता पाकळीयुक्त ल असं लिहावं लागणार आहे. तर गाठयुक्त श ऐवजी आता शेंडीयुक्त श असं लिहावं लागणार आहे. हिंदींचं अतिक्रमण रोखण्यासाठी हे बदल करण्यात आलेत. मराठी भाषा विभागानं हे महत्त्वाचे बदल केले आहेत.
Continues below advertisement