Shailaja Darade Case : शिक्षक घोटाळ्याच्या आरोपाखाली दराडेंवर गुन्हा दाखल, पुढील तपास काय?
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे... शिक्षक नोकरभरती घोटाळ्याच्या आरोपाखाली शैलजा दराडेंसह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेंवर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.. 2019 मध्ये शिक्षण संचालनालयात कार्यरत असताना कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे... सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून त्यांच्या नात्यातील दोन महिलांना नोकरी देण्याच्या नावाखाली १२ ते १४ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे... पैसै देऊनही नोकरी न मिळवल्याने तक्रारदार सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिलेत.... दरम्यान तक्रारदार पोपट सुर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये...याप्रकरणी दराडेवर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..