9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :1 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :1 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA
पुण्यातल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद...हाकेंनी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा मराठा आंदोलकांचा दावा, तर वैद्यकीय अहवालात हाकेंना क्लीनचिट
आरोपांची शहानिशा पोलीस करतील, पण मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मराठा आंदोलकांसोबतच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर करण्यात येणार, डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल होणार सादर.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.....तर अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचा शरद पवारांचा आरोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर..तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत रात्री महत्त्वाची बैठक
मविआच्या बैठकीत विदर्भातल्या बहुतांश जागांवर चर्चा, आव्हाडांची माहिती..पितृपक्षानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता...आज पुन्हा बैठक
आजपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती.. पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, बंटी पाटील, अमित देशमुखांसह इतर नेत्यांवर उमेदवार निवडीची जबाबदारी
बीआरएसची प्रदेश शाखा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये होणार विलीन, पुण्यात ६ ऑक्टोबरला जाहीर कार्यक्रमात पक्ष विलिनीकरण
राज्यात आठ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची एबीपी माझाला माहिती
लडाखमधील शिक्षण चळवळीचे प्रणेते सोनम वांगचूक यांचा लडाख-दिल्ली लाँग मार्च दिल्ली सीमेवर, प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचूक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान....तिसऱ्या टप्प्यात बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा यासह ७ जिल्ह्यांमध्ये ४० जागांसाठी आज मतदान होणार