9 Second News : नऊ सेकंदांत बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 29 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 Second News : नऊ सेकंदांत बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 29 August 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता, दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना
लोकसभेप्रमाणे विधानसभेत ही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्व्हे
विधानसभेच्या प्रचारात नितीन गडकरींचा सहभाग वाढवा, संघाची आग्रही मागणी, गडकरींची प्रतिमा भाजपला मदतीची ठरेल अशी संघाला अपेक्षा, संघाने गडकरींना निवडणूक नियोजनात सक्रिय राहण्यास सांगितल्याची माहिती.
राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक. एक सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार. उद्धव ठाकरेंची घोषणा
पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन, सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार, त्या-त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार.