9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 11 July 2024 : ABP MAJHA

Continues below advertisement

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 11 July 2024 : ABP MAJHA 

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ३-४ मतं फुटणार, शेकापच्या जयंत पाटलांचा दावा, काँग्रेसच्या तीन ते चार डाऊटफुल आमदारांची व्यवस्था पक्ष करेल, कैलास गोरंट्याल यांचा इशारा
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा विश्वास...
विधानसभा निवडणुकीत भाजपनं १८० पेक्षा कमी जागा लढू नये, अनेक भाजप नेत्यांचं मत, बावनकुळेंनी वृत्त फेटाळलं, तर शिरसाट म्हणतात समसमान जागावाटपावर याआधीच झालीये चर्चा 
दिशा सालियन केसबद्दल केलेल्या दाव्यांप्रकरणी नितेश राणेंना पोलिसांकडून समन्स... माझ्याकडचे पुरावे पोलिसांना देणार, नितेश यांची प्रतिक्रिया
बीडमध्ये मनोज जरांगेंच्या सभेला हजारोंची गर्दी, महायुती, मविआचे नेते एकसारखेच, सर्वपक्षीय बैठकीवरुन जरांगेंचा हल्लाबोल
भुजबळांच्या माध्यमातून राज्यात जातीय दंगली घडवण्याचं सरकारचं स्वप्न, बीडमधून मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप, मराठ्यांना विरोध करणाऱ्यांना पाडा, जरांगेंचा इशारा
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पुणे पोलिसांनाच दमदाटी, ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गेटबाहेरच उभं केलं 
पुण्यातून उचलबांगडी झाल्यानंतर दोन दिवसांनी पूजा खेडकर वाशिममध्ये सेवेत दाखल...वादावर बोलायला दिला नकार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram