MCA Elections : एमसीए अध्यक्षपदासाठी मोठी चुरस, 6 जणांचे अर्ज दाखल

Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली असून, विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik), आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), प्रसाद लाड (Prasad Lad), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि माजी कर्णधार डायना एडुलजी (Diana Edulji) यांच्यासह एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय 'आमदार मिलिंद नार्वेकरांना जय शहा यांचा आधार हवाय', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी शरद पवार यांना फोन केला होता, तर नार्वेकरांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड आणि विहंग सरनाईक यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola