Nanded Rain Update : नांदेडच्या बिलोली गावात मानवी साखळी करत ओढ्याच्या पुरात अडकलेल्यांची सुटका

Continues below advertisement

नांदेड जिल्ह्यात ओढ्याला आलेल्या ओढ्याला आलेल्या पुरातअडकलेल्या 70 ते 80 नागरिकांना गावकऱ्यांनी वाचवलं आहे.  बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे  मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून आले. त्यातच रामतीर्थ गावा शेजारी असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात शेती कामासाठी गेलेले 70 ते 80 स्त्री पुरुष शेतकरी व कामगार या पाण्यात अडकून पडले.शेतातील कामासाठी गेलेल्या ह्या पुरुष व महिला यांनी पूर आल्यामुळे गावाच्या कडेला असलेल्या ओढ्याच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आणि गावातील नागरिक  वेळीच प्रसंगावधान दाखवून धावून आले. त्यावेळी गावकऱ्यांनी ओढ्याच्या तीरावरील  झाडाला दोरखंड बांधून व मानवी साखळी करून 70 ते 80  महिला पुरुषांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram