Corona मुक्त झालेल्या गोंदियात 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, Gondia जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनानं शिरकाव केलाय. एकाच दिवशी कोरोनाचे नवे सात रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता पुन्हा वाढलीय. सापडलेले सर्व रुग्ण तिरोडा तालुक्यातले आहेत. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या 23 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. पण अवघ्या काही दिवसांतच पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालाय.