Maharashtra Hearing :सत्तासंघर्षाच्या प्रकरणातली सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, आज काय होणार

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण आज  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणातली एक महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होतेय.. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावं अशी ठाकरे गटाची मागणी आहे...  त्यामुळं आज सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडं सर्वाचं लक्ष लागलंय. घटनापीठा समोर असलेल्या मुद्द्यांपैकी एका मुद्द्यावर म्हणजेच पीठासीन अधिकारी अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात की नाही, या मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्यची ठाकरे गटाची मागणी आहे... मात्र नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत कोर्टानं असं होऊ शकत नसल्याचा निकाल दिल्यानं याबाबत फेरविचार व्हावा अशी ठाकरे गटाची मागणी आहे... त्यामुळेच आता हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जातं का हे पाहावं लागणार आहे... हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेलं तर आणखी वेळ लागेल. जर सध्याच्या घटनापीठाकडे राहिलं तर मग सलग सुनावणी तातडीने सुरु होणार का याचीही उत्सुकता असणार आहे. या अगोदर दोन न्यायमूर्तींचं व्हेकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टानं विनंती मान्य केली तर सात न्यायमूर्तींचं बेंच असेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola