Rajesh Tope : राज्यात 66 डेल्टा प्लसचे रुग्ण, दोन डोस घेऊनही होतेय Delta Plus ची लागण?
Continues below advertisement
Delta Plus: महाराष्ट्रामध्ये डेल्टा प्लसच्या रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्णांची संख्या 66 वर गेली असून आतापर्यंत 5 डेल्टा प्लस बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान बाधित एकूण 66 रुग्णांपैकी 10 जणांनी कोविड प्रतिबंधक दोन्ही डोस घेतले असून 8 जणांनी एक डोस घेतल्याची देखील माहिती टोपे यांनी दिली आहे. आजवर राज्यात डेल्टा प्लस बाधित 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यांना इतर आजार असल्याचं देखील टोपे यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement