Maharashtra #Corona दिवसभरात राज्यात 6112 कोरोनाग्रस्तांची नोंद, 24 तासात 823 नवे कोरोनाग्रस्त
कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येत असल्याचं दिसत असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे आता गृह विलगीकरण, लग्न समारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी कोरोनाचे नियम भंग करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारावेत, त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. लग्न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱ्या आयोजकांसह व्यवस्थापनांवरही गुन्हे दाखल करावेत. मास्कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये 300 मार्शल्स नेमावेत तसेच मुंबईतील मार्शल्सची संख्या दुप्पट करावी, पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळणाऱ्या इमारती प्रतिबंधित (सील) कराव्यात, यासह विविध सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केल्या आहेत.