Mumbai Goa : मुंबई ते सिंधुदुर्ग व्हाया रायगड आणि रत्नागिरी असा 400 किमीचा कोकण एक्स्प्रेसवे बनणार
कोकणात जाताना नेहमीच कोकणवासीयांना आणि पर्यटकांना खडतर रस्त्याचा सामना करत जावा लागतं. त्यासाठी राज्य सरकारने मुंबई-गोवा हायवे आणि मुंबई शिवडी न्हावा-शेवा हे प्रकल्प सुरू केले. मात्र हे प्रकल्प अजून ही अर्धवट असतानाच आता राज्यसरकारने मुंबई ते सिंधुदुर्गाला जोडणाऱ्या ग्रीन फिल्ड कोकण महामार्ग ची घोषणा केली आहे.