Amravati महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कामाच्या तासात 4 तासांची कपात, 8 तासांची ड्युटी
Continues below advertisement
Amravati : महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागते. पोलिसांवर सुरक्षितता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असल्याने कामाचा व्याप मोठा असतो. ड्यूटीच्या तासांहूनही अधिक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी अमरावती शहराच्या हद्दीतील 10 पोलीस स्टेशनमधील जवळपास 300 महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत कपात केल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
Continues below advertisement