Ajit Pawar : ...म्हणून कुणाचाही पेट्रोल पंप असो, फोटो मोदींचाच लावायचा, नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Continues below advertisement
बारामती - आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक उत्तम प्रकारे काम करणारे पंतप्रधान आपल्या देशाला मिळाल्याचे पाहिले. आता पंतप्रधान पदावर मोदी साहेब आहेत. त्यांनी अलीकडे कोणाचाही पेट्रोल पंप असला तरी तेथे त्यांचा (मोदींचा) फोटो लावायचाच असा नियम केला आहे. त्यामुळे आम्ही गमतीने असे म्हणतो की पेट्रोल 100 च्या पुढे गेलं.. की पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं... मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली.. घाल आता 100 रुपयाचे पेट्रोल असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. येथील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होते.
Continues below advertisement