Maharashtra 3-language policy | GR रद्द, ५ जुलैला दोन्ही ठाकरेंचा एकत्र विजयी मेळावा!
सरकारने त्रिभाषा धोरणासंदर्भातला जीआर रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ५ जुलैला वरळी डोम येथे भव्य विजयी मेळावा आयोजित करणार असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येतील. मेळाव्याच्या नियोजनासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.