Kolhapur-Solapur Highway | शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार,राजू शेट्टी आंदोलनात सहभागी
कोल्हापूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. कोल्हापूर, सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी आणि लातूरमध्ये शेतकऱ्यांनी रस्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. 'कुठल्याही स्थितीमध्ये महामार्गाला जमीन देणार नाही' अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलिसांनी राजू शेट्टींना आधीच नोटीस दिली होती, मात्र ते आंदोलनस्थळी दाखल झाले. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाहायला मिळत आहे.