ST Strike : परभणी विभागातील एसटी महामंडळाचे 205 कर्मचारी निलंबित, महामंडळाची मोठी कारवाई
परभणी विभागातील एसटी महामंडळाचे 205 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. कामावर रुजू होत नसल्यानं एसटी महामंडळानं ही कारवाई केली. कारवाईनंतरही एसटी कर्मचारी शासकीय विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटीचं शासनात विलीनीकरण करावं, या मागणीसाठी जवळपास 3 आठवड्यांपासून परभणी विभागातील एसटी कर्मचारी आंदोलन करताहेत. त्यामुळे सध्या परभणीतील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने शासन आता काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.