Ghatkopar : गणपतीला 2 कोटींचे दागिने, अखिल भटवाडी मंडळाचे सामाजिक उपक्रम, नखशिखान्त सजलेला बाप्पा
मुंबईचा गणपती हा भव्य दिव्य देखावे, आकर्षक उंच मूर्ती यामुळे साऱ्या जगात ओळखला जातो. याचबरोबर या मूर्त्यांवरील सुवर्ण दागिने आणि सामाजिक उपक्रम हे देखील विशेष असते. मुंबईचा सुवर्णराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या घाटकोपर च्या भटवाडी विभागातील बर्वेनगर आणि अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील त्यांच्या गणपतीच्या सुवर्ण अलंकार आणि हटके सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
या गणपती च्या मूर्तीवर तब्बल दोन कोटी पर्यंत किमतीचे दागिने परिधान करण्यात आले आहे. या मंडळाने वर्ष भर, रक्तदान शिबिर, प्लाझ्मा दान, शैक्षणिक साहित्य वाटप,कोरोना योद्धा सन्मान, मोफत कोरोना प्रतिबंधक लस, आणि विभागातील लहान मुलींचे भारतीय टपाल विभागात सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडून त्याचा पहिला हप्ता मंडळ भरते आहे जेणेकरून विभागातील लहान मुलींना त्यांच्या शिक्षण आणि विवाहसाठी मदत होईल. अशा प्रकारे या मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवत या गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे.