Kolhapur: परदेशातून कोल्हापूरात 122 प्रवाशी, तर इतर चार जिल्ह्यात परदेशातून 433 प्रवाशी दाखल ABP Majha
तिकडे कोल्हापुरात गेल्या काही दिवसांत परदेशातून दाखल झालेल्यांची संख्या १२२ च्या घरात असून, त्यापैकी ३८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र इतर प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 433 प्रवासी परदेशातून दाखल झाले असून, ८४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.