100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025
संतोष देशमुखांची हत्या करताना मारेकरांच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप अथवा भीती नव्हती, सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासातून माहिती समोर.
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, मुंबईमध्ये संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, बीड प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी यासंदर्भातच भेट घेणार असल्याची माहिती
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी.
देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच वादात, वाल्मिक कराडच्या जवळचे ७ ते ८ अधिकारी एसआयटीत, वडेट्टीवारांची माहिती
बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी, अंजली दमानियांची मागणी