100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 Pm
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 Pm
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल याचिका प्रलंबित ठेवण्याची धनंजय देशमुख यांची न्यायालयाला विनंती, तपास यंत्रणेला आणखी वेळ देण्याची विनंती,
राजीनामा दिलेला नाही, राजीनाम्याच्या चर्चांवर मंत्री धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण,, काल धनंजय मुंडेंनी घेतली होती अजित पवारांची भेट.
नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजानामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंनी केली मागणी, सरपंच हत्या प्रकरणात सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचीही सुप्रिया सुळेंची मागणी.
जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही, न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कारवाई होणार, अजित पवारांची भूमिका.
आम्हालाही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं..तेव्हा नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावा नाही असं दादा म्हणाले नाहीत, संजय राऊतांचा अजित पवारांवर पलटवार.