100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 6 AM : 16 June 2024 : ABP Majha
100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एक क्लिकवर : 6 AM : 16 June 2024 : ABP Majha
परभणीच्या जिंतुर तालुक्यात मुसळधार पाऊस, बामणी-जिंतुर रस्ता काही काळ बंद, जीव धोक्यात टाकत दुचाकीस्वारांचा प्रवास.
हिंगोलीच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील ओढ्यांना पूर, जिंतूर- औंढा नागनाथ वाहतूक ठप्प.
एक तासाच्या पावसामुळे परभणीच्या जिंतुरमध्ये पाणीच पाणी, अनेक ओढ्यांना पुर, २० ते २५ गावांचा संपर्क तुटला.
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा, मोहरी परिसरात मुसळधार पाऊस, शेतातील सुपीक माती वाहून गेल्यानं शेतात पेरणी कशी करावी शेतकऱ्यांसमोर प्रश्न.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कहाटूळ शिवारात मुसळधार पाऊस, पावसामुळे पपई, केळी पिकांचं नुकसान.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था, वसईच्या ससुनवघर परिसरात रस्त्याची चाळण, अर्धवट कामामुळे वाहनचालक हैराण.
नांदेड जिल्ह्यातील काही भागात पावसाचं आगमन, अर्धापूर, मुदखेड यासह इतर तालुक्यात दमदार पाऊस, पावसामुळे लहान गावातील व्यापाऱ्यांची मोठी धावपळ.