100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नवा गौप्यस्फोट, छोटा शकीलचा आवाज काढण्यासाठी Software ची मदत
१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात नवा गौप्यस्फोट झालाय. वसुली प्रकरणात गँगस्टर छोटा शकीलचा आवाज काढण्यासाठी सॉफ्टवेअरची मदत घेतल्याची माहिती सीआयडीने दिली. व्यापारी श्यामसुंदर अग्रवालला फसवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर आणि व्हीपीएनचा वापर करण्यात आला होता. यासाठी संजय पुनामियाने एका सायबर एक्सपर्टची मदत घेऊन हा सॉफ्टवेअर बनवला असल्याची माहिती समोर आलीय.