1 Min 1 Constituency : चर्चेचे झोंबरे वारे; मतभेदाचे निखारे ? : ABP Majha
1 Min 1 Constituency : चर्चेचे झोंबरे वारे; मतभेदाचे निखारे ? : ABP Majha
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha) अनुषंगाने जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खडाजंगी होत असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप हे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे आडत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे याबाबत दिल्लीतील काँग्रेसकडे नाना पटोले (Nana Patole) यांची तक्रारही करण्यात येणार आहे. जागावाटपाची चर्चा ठाकरेंचे नेते हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी करत आहेत, तिढा असलेल्या जागा लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जावे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवरुन व सहभागावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं स्पष्ट झालंय.