Sanjay Raut | कर्नाटक सरकारला झुगारून बेळगावत जाणार : संजय राऊत | मुंबई | ABP Majha

ज्या बेळगावात मराठी भाषिकांना कन्नडिगांच्या दडपशाहीचा सामना करावा लागतो.. त्या बेळगावात आज शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत दाखल झालेत. कन्नड संघटनेच्या इशाऱ्याला आणि विरोधाला झुगारुन संजय राऊत बेळगावात दाखल झाले. कर्नाटक नवनिर्माण सेनेसह इतर कन्नड संघटनांचा विरोध पाहता राऊत पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये पोहोचले. बेळगावमध्ये नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनानंतर संजय राऊतांची प्रकट मुलाखत होणार आहे. यावेळी कन्नडिगांकडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या दडपशाहीबद्दल संजय राऊत काय बोलणार याकडे महाराष्ट्रासह कर्नाटकचंही लक्ष असणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola