Minister Bacchu Kadu | जिथं जिथं भाजपचं सरकार, तिथं तिथं शेतकऱ्याचं मरण - राज्यमंत्री बच्चू कडू
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात मध्य प्रदेश काँग्रेस यांचा महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रात पसंती नंतर बच्चु कडू यांना मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पसंती पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मोर्चाकडे केवळ मध्यप्रदेशच नव्हे तर महाराष्ट्राचे सुद्धा लक्ष लागले होते. यावेळी पांढुर्णा काँग्रेसचे आमदार निलेश उइके यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येने मध्यप्रदेश मधील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
Tags :
Madhya Pradesh Congress Bacchu Kadu Help Akola Bacchu Kadu Minister Bacchu Kadu Farmer Loss Akola Bacchu Kadu Madhya Pradesh Agriculture Bill Farmer Bill Farmer Protest Congress