महाराष्ट्रात शिणोळी येथे कन्नड रक्षक वेदिकेचा ध्वज लावण्याचा प्रयत्न,कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
बंगळुरू आणि अन्य गावातून कन्नड संघटनाचे कार्यकर्ते बेळगावात दाखल झाले होते. कित्तुर चन्नमा चौकात हे कार्यकर्त्यांनी जमून रास्ता रोको केला. यावेळी शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रतिमा देखील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकली. तेथून हे कार्यकर्ते शिनोळी येथे जाऊन शिवसेनेचा निषेध करून कन्नड ध्वज लावणार होते, पण पोलिसांनी त्यांना राणी कित्तुर चन्नमा चौकात ताब्यात घेतले.
Continues below advertisement