Lear Corporation Pimpri | पिंपरीत एकाच कंपनीतील 110 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कंटेन्मेंट झोनमधील कर्मचारी बोलावल्याने संकट

देश-विदेशातील नामवंत कंपन्या विस्तारलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसी कोरोनाने हैदोस घातलाय. एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ऑटोमोटिव्ह सिटिंग आणि ई-सिस्टम्स बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ही धक्कादायक बाब समोर आली. नुकतंच एका कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने 800 कामगारांच्या खाजगी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या. पैकी आणखी अहवाल प्रतीक्षेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने कंपनीने कोरोनाच्या उपाययोजनांचं उल्लंघन केल्याचं प्रशासनाच्या तपासात समोर आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola