Maharashtra Sadan Delhi | जोरदार पावसामुळे दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला गळती,छताखाली बादल्या ठेवायची वेळ
Continues below advertisement
नवी दिल्ली : बांधकामापासूनच चर्चेत असलेलं दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आहे. दिल्लीत यावेळच्या मोसमात पडलेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने महाराष्ट्र सदनाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण केलं आहे. कारण छत गळतंय म्हणून महाराष्ट्र सदनाच्या अगदी लॉबीतच वेगवेगळ्या ठिकाणी बादल्या मांडून ठेवल्याचं चित्र दिसलं.
महाराष्ट्र सदनाच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन जून 2013 मध्ये करण्यात आलं होतं. अजून या इमारतीला 10 वर्षेही झाले नाहीत तोवरच असं चित्र दिसू लागलं आहे. महाराष्ट्र सदनात प्रवेश केल्यानंतर लगेच एक प्रशस्त लॉबी आहे. या प्रशस्त लॉबीला स्कायलाईट (काचेचं) छत आहे. या छतातून पावसाचं पाणी गळू लागल्याने पाच ठिकाणी छोट्या छोट्या बादल्या मांडल्याचं चित्र काल (17 ऑगस्ट) पाहायला मिळालं.
Continues below advertisement