Laziness of NMC Workers शिस्तप्रिय तुकाराम मुंढे गेले अन् कर्मचारी सुस्तावले,शिस्तीसाठी मुंढेच हवे?
तुकाराम मुंढे हे महापालिका आयुक्त पदावरून दूर होताच नागपूर महापालिकेत आधीचीच शिथिलता दिसून येऊ लागल्याचे चित्र आहे. आज सकाळी मावळते आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फोनवरून नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला. त्यानंतर नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अधिकाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. नंतर नवे आयुक्त लगेच आढावा महापालिकेच्या विविध विभागाच्या बैठकीत व्यस्त झाले. मात्र, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता महापालिकेचे आयुक्त नाही या भावनेने अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिकेत उशिरा येताना दिसले.