Shivajirao Kalge Latur : वयाच्या 87 व्या वर्षी शिवाजीराव काळगेंचे वडिल लेकाच्या प्रचारासाठी मैदानात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivajirao Kalge Latur : वयाच्या 87 व्या वर्षी शिवाजीराव काळगेंचे वडिल लेकाच्या प्रचारासाठी मैदानात लातूर लोकसभेची उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा आणि त्यांचे वडील ही मैदानात उतरले आहेत... शिवाजीराव काळगे यांचे वडील बंडप्पा काळगे हे वयाच्या 87 वर्षीही मुलाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे जुन्या काळापासून ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. शिवाजीराव काळगे यांचे चिरंजीव सोहम हा भोपाळ इथे वैद्यकीय शिक्षण घेतो. वडिलांच्या प्रचारासाठी तो ही लातूरमध्ये आहे. आपली काही मित्र घेत त्यांनी युवा पिढीला साथ घालत प्रचार सुरू केला होता. बॅनर पोस्टर च्या काळापासून ते सोशल मीडिया पर्यंतच्या जमाने पर्यंत या निवडणुकीत तीन पिढ्या एकत्र उतरल्या आहेत... त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी