Latur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!

Continues below advertisement

Latur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!

Latur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!  जून महिना उजाडला असून दिवसेंदिवस पाणी टंचाईचे दुर्भिक्ष वाढत आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण आठ दिवसांपासून मायनसमध्ये गेले आहे. योग्य नियोजनामुळे शहराला 4 दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. मांजरा पाठोपाठ  निम्न तेरणा प्रकल्पही शून्य टक्क्यांवर आला आहे.  जिल्ह्यात मोठे 2 आणि मध्यम 8 प्रकल्प आहेत. सर्व प्रकल्पातील पाणी हे पिण्यासाठीच राखून ठेवण्यात आले असताना देखील जिल्ह्यात 59 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अधिग्रहण किंवा टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यास चार दिवसांत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून टँकर मंजूर करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.       लातूर जिल्ह्यात 145 किलोमीटरचा अंतर कापत मांजरा नदी प्रवास करत असते.. लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर मांजरा नदीवर मांजरा धरण निर्माण करण्यात आला आहे. या धरणातील पाण्यावरच लातूरकरांची तहान अवलंबून असते... मांजरा धरण सध्या मृत साठा वर आले आहे.. 145 किलोमीटर अंतरावर मांजरा नदी जिल्ह्यातून वाहत असताना त्यावर 11 बॅरेजेस बांधण्यात आले आहेत. मांजरा नदीचे 145 किलोमीटरचे पात्र आणि 11 बेरीज यामध्ये पाणी नगण् आहे...       मांजरा नदी काठी वसलेलं महापौर हे गाव आज पाणीटंचाईचा सामना करत आहे... पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.. सांडपाण्याचा पणीही विकत आणण्याची वेळ महापूर मधल्या लोकांवर आली आहे....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram