Latur Unseasonal Rain: लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फळबागांना फटका
Latur Unseasonal Rain: लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फळबागांना फटका लातूर जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ९ जनावरे दगावली असून, लातूर आणि जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झालंय. या दोन तालुक्यात मिळून जवळपास २५ एकर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिलीय. औसा तालुक्यातील किल्लारी भागातील नांदुर्गा शिवारातील बाबूराव बिराजदार यांची एक एकर द्राक्षाची बाग सोसाट्याच्या वादळी वाऱ्यात आडवी झाली आहे. दोन दिवसात द्राक्ष एक्सपोर्ट होणार होते त्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय. काहीशी अशीच अवस्था जळकोट तालुक्यातील अंबा बागायतदार शेतकऱ्याची झाली आहे.पंडित दळवे केकत शिंदगी येथील शेतकरी यांनी चार हजार केशर आंब्याच्या झाडे लावली होती.त्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.याच भागात पडलेल्या पावसामुळे ज्वारी मका कांदा हळद यासारख्या पिकांना फटका बसला आहे.