Latur Sonkhed Monkey : वन विभागाने चुकीच्या वानराला कैद केलं, हल्लेखोर वानर अजूनही मोकाट ABP Majha

Continues below advertisement

Latur Sonkhed Monkey : वन विभागाने चुकीच्या वानराला कैद केलं, हल्लेखोर वानर अजूनही मोकाट ABP Majha

सोनखेडकरांच्या पाठीमागचं शुक्ल कष्ट संपायचं नाव घेत नाही. वानराचा पुन्हा हल्ला चार लोक जखमी. वन विभागांने पकडलेल्या वानर ते नव्हेच अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
 मागील चार दिवसापासून लातूर जिल्ह्यातील सोनखेड येथे एका वानराने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चार दिवसांमध्ये 40 पेक्षा जास्त गावकऱ्यांना आणि चार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या वानराने चावा घेत जखमी केलं होतं. औरंगाबाद आणि लातूरच्या वन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत या वानरला आज सकाळी जेरबंद केलं.. पिंजऱ्यामध्ये या वानरासह इतर चार वानर जेरबंद झाली होती.अशी माहिती वनविभागाने दिल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निस्वास घेतला होता. चार दिवसापासून घराच्या बाहेर न पडलेली लोक दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतानाच.. आज संध्याकाळच्या वेळेला एका वानराने पुन्हा गावातील चार लोकांना वर हल्ला केला आहे. मग पकडलेलं वानर कोणता असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सोनखेडकरांना मागील चार दिवसापासून त्रस्त करणाऱ्या वानरास आम्ही जेरबंद केलं आहे. त्याचबरोबर इतर मोठी चार वानरे आम्ही जेरबंद केली होती... या सर्व वानरांना आम्ही औरंगाबाद कडे पाठवलं आहे. टोळीतील जोडी फुटल्या कारणाने काही वानरे थोड्याफार काळासाठी काही प्रमाणात असं वागू शकतात. गावकऱ्यांनी शांत राहत त्याकडे दुर्लक्ष केल्यास दोन दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते.अशी माहिती संतोष बंद वन परिमंडळ अधिकारी निलंगा यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram