Latur Nilanga APMC : निलंग्यात भाजपचेच 2 पॅनल मैदानात, निवडणुकीची चुरस वाढली

Latur Nilanga APMC : निलंग्यात भाजपचेच 2 पॅनल मैदानात, निवडणुकीची चुरस वाढली

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघातील 68 गाव हे निलंगा तालुक्यात येतात. निलंगा तालुक्यावर वर्चस्व आहे ते आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे... या 68 गावातील पवार यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं होतं की आम्हाला निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान सात जागा मिळाव्यात.. चार जागेवरही ते समाधानी होते .
     मात्र मागील पंचवीस वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचे संपूर्ण पॅनल हे निलंगेकर यांच्या प्रभावातील होते.त्यात आता आमदार अभिमन्यू पवार यांचा स्वतःचा मतदारसंघ सोडून असलेल्या निलंगा दाखवलेल्या इंटरेस्टमुळे संभाजी पाटील निलंगेकर यांचे कार्यकर्ते नाराज होते.. यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांची बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे आक्रमक झाले. त्यांनी थेट आव्हान देत आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा निवडणूक लढवा असेच सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola