Latur Buses Fire : दोन कोटींची राख! शॉर्टसर्किटमुळे 7 खासगी बसेस जळून खाक
रात्री दोन वाजल्याच्या नंतर लातूर आत एक धक्कादायक घटना घडली आहे... लातूर शहरातील रिंग रोड भागात.. डेटिंग आणि पेंटिंग करणाऱ्या एका दुकानातील सात ट्रॅव्हल्स अक्षरश जळून खाक झाल्या आहेत.. या ठिकाणी या सात ट्रॅव्हल्स काम सुरू होतं.. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर या ठिकाणी असलेल्या हाय टेन्शन तार तुटल्याने.. शॉर्ट सर्किट झालं.. त्यातून खाली उभा असलेल्या ट्रॅव्हल्सला आग लागली.. पाहता पाहता या ठिकाणी उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत.. याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली होती.. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पथकही तिथे दाखल झालं होतं.