Ashish Shelar : मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर - आशिष शेलार ABP MAJHA
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना आता भाजपने सत्ताधारी शिवसेनेला आरोपीला पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाली असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी महापालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांचे बाण सोडले. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' समजला जातो.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena BJP Aditya Thackeray शिवसेना भाजप आरोपी मुंबई महापालिका Mumbai Municipal Corporation Accused आदित्य ठाकरे प्रकल्प Coastal Road कोस्टल रोड Project Elections Finance BJP निवडणुक BJP Leader MLA Ashish Shelar