Raju Shetty : पाच वर्षांत स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला? राजू शेट्टींनी सांगितली संपूर्ण कहाणी
Raju Shetty : पाच वर्षांत स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला? राजू शेट्टींनी सांगितली संपूर्ण कहाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांचा ऑफर काय होता आणि तो का नाकारला... राजू शेट्टीने सांगितली संपूर्ण कहानी... हातकणंगले मतदारसंघात प्रचार तोफा शांत झाल्यानंतर आज राजू शेट्टी शिरोड मध्ये आपल्या कुटुंबासोबत निवांत रमले आहेत... हातकणंगलेची जागा मला द्या अशी मागणी महाविकास आघाडीकडे कधीच केली नव्हती.. तरीही महाविकास आघाडीचे अनेक नेते हातकणंगलेची जागा राजू शेट्टी साठी सोडली असे जाहीर करून भ्रम निर्माण करत होते असे राजू शेट्टी म्हणाले.. फक्त एकदा उद्धव ठाकरे यांना भेटून हातकणंगले मधून तुमच्या गद्दाराला पराभूत करण्यासाठी तुम्ही उमेदवार देऊ नका असे सांगितले होते.. उद्धव ठाकरे ही त्यासाठी तयार होते.. मात्र यादी जाहीर करण्याच्या आदल्या दिवशी मला मशाल वर लढण्यासाठी सांगण्यात आले.. मात्र, तसे केले असते तर ठाकरे गटाच्या घटनेमुळे मला शेतकरी चळवळ नेहमीसाठी सोडावी लागली असती.. ते मला कधीच करायचे नव्हते, म्हणून उद्धव ठाकरे यांचा ऑफर नाकारल्याचा खुलासा ही... राजू शेट्टी यांनी केला.. यावेळी त्यांनी एबीपी माझा अशी बातचीत करताना गेल्या पाच वर्षात काय काय घडलं आणि कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र राहण्याचा निर्णय का घेतला याची संपूर्ण कहाणी ही सांगितली...